मध्य रेल्वेवर आज रात्री विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आज रात्री विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं काम आज मध्यरात्री करण्यात येणार आहे. त्यासाठी आज रात्री १०.४५ ते रविवारी पहाटे ६.१५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे

.मध्य रेल्वेच्या सीएसटी ते मुंब्रा स्टेशनदरम्यान हा विशे मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या स्टेशनदरम्यांची वाहतूक तब्बल सात बंद असणार आहे.

सीएसटीहून ११ वाजून १८ मिनिटांनी शेवटची कर्जत ट्रेन सुटेल. तर अप मार्गावर कसा-याहून सुटलेली गाडी सीएसटी स्थानकावर ११.३१ वाजता पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *