‘ऍप’च्या अपयशामुळे;IT तील तरुणाची आत्महत्या!

‘ऍप’च्या अपयशामुळे;IT तील तरुणाची आत्महत्या!

‘व्हॉटस्‌ ऍप‘ या लोकप्रिय मेसेंजर ऍपपेक्षा अधिक लोकप्रिय ऍप तयार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मात्र ते प्रत्यक्षात न उतरल्याने अस्वस्थ झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका अभियंत्याने आत्महत्या करून आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबाद येथील डीके रस्त्यावर स्वर्ण प्लाझा येथे लकी गुप्ता अगरवाल हा 33 वर्षांचा तरुण कुटुंबियांसमवेत राहात होता. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. दरम्यान बुधवारी सकाळी त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या खोलीचे दार वाजवून त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून काढला. त्यावेळी खोलीत लकीचा मृतदेह आढळून आला. अत्यंत सोप्या आणि वेदनारहित पद्धतीने नायट्रोजनचा उपयोग करून आत्महत्या करत असल्याचे लकीने लिहिलेल्या पत्रात आढळून आले आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन फूटाचे एक नायट्रोजन सिलेंडर तसेच त्याला जोडलेली नळी (पाईप) ताब्यात घेतला आहे.

‘व्हॉटस्‌ ऍप‘पेक्षा अधिक लोकप्रिय ठरेल अशी ऍप तयार करत असल्याचे लकी नेहमी म्हणत होता, मात्र त्यामध्ये यश न मिळाल्याने तो अलिकडे नैराश्‍यामध्ये असल्याचे लकीच्या कुटुंबियांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *