अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

अभिनेत्यांच्या पत्नींमध्ये माझ्यामुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाली असल्याचा खळबळजनक खुलासा बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने केला आहे. मीडियामधील काही बातम्यांचा आधार घेत सनी लिऑनने हा खुलासा केला आहे.

२०१२ मध्ये प्रदर्शित फिल्म ‘जिस्म २’ च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या सनी लिऑनने म्हटले की, माझा बॉलिवूडमध्ये असा अनुभव आहे ज्याचा मी विचारही करू शकत नाही. कधी माझ्याबाबतीत चांगल्या बातम्या ऐकायला येतात तर कधी विचित्र… कधी सर्व गोष्टी चांगल्या होतात तर कधी अत्यंत क्लेशदायक… जेव्हा माझे गाणे किंवा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतो तेव्हा मला तो एका रोलर कोस्टर राइड प्रमाणे वाटते.

मी भारताच्या कायदेशीर यंत्रणेचा अभ्यास करीत आहेत. मला आणि माझा पतीला अनेक वेळा सहजपणे निशाणा बनवले जाते. या देशात तुमच्या विरूद्ध प्रकरण दाखल करण्यात येते आणि त्यावर तुम्हांला स्पष्टीकरण द्यावे लागते. मला माझे पक्ष ठेवण्यात काही प्रॉब्लेम नाही, पण अशा प्रकारच्या गोष्टी मन, शरीराला ठेच पोहचवितात.

मी जितक्याही स्टारसोबत काम केले ते विवाहीत आहेत. मी जेव्हा कधी त्यांच्या पत्नीशी भेटते तेव्हा त्यांच्यासह त्यांच्या पतीसोबत अधिक काळ घालवते. पण तरीही त्यांच्या पत्नींना माझी भीती वाटते. मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांच्या पती आणि बॉयफ्रेंडमध्ये मला काही इंटरेस्ट नाही. कारण माझ्या जवळ जगातील सर्वात शानदार पती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *