दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर भूकंपच्या धक्क्याने हादरले. रविवारी सकाळी पश्चिम समुद्रकिना-याजवळ ७.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे ४१ नागरिक मृत्यूमुखी पडले. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
भूकंपाचे केंद्र आग्नेय समुद्रकिना-यावरील मुईज्नेजवळ होते. हा धक्का इतका मोठा होता की, काही भागांमध्ये इमारतीला भेगा पडल्या आहेत तर घरांची छत कोसळली आहे. भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती अधिका-यांकडून समजते.
उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लेस यांच्या माहितीनुसार, आजूबाजूच्या सहा शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. शिवाय बचावकार्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत.
भूकंपाच्या केंद्राच्या ३०० किमी क्षेत्रातील समुद्रकिना-याजवळच्या परिसरात उंच लाटांची शक्यता आहे, असे पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितले.