मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकानंतर आता पुणे येथील रेल्वे स्थानकावर ‘रेलटेल’ने गुगलच्या सहकार्याने मोफत ‘वायफाय’ इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
प्रवाशांना आता इच्छुक ठिकाण सर्च करणे, व्हिडिओ बघणे, गेम्स खेळणे, आदी सुविधांचा लाभ होणार आहे. जानेवारीमध्ये मुंबई सेंट्रल पासून रेल्वे स्थानकापासून सुरु झालेल्या या प्रकल्पामध्ये आता पुण्यासह रायपूर, रांची, भुवनेश्वर, भोपाळ, विजयवाडा, काचेगुडा, एर्नाक्युलम, विशाखापट्टणम या १० स्थानकांवर हे नेटवर्क कार्यान्वित झाले आहे.
२०१६ वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातील महत्वाच्या १०० स्थानकांमध्ये वायफाय सुविधा सुरु होणार आहे.
‘रेलटेल’च्या फायबर नेटवर्कवर आधारित असलेल्या वायफाय सुविधेची रचना ग्राहकांना हायस्पीड ब्रॉडबँड अनुभव देण्यासाठी केली असल्याचे गुगल इंडियाच्या अॅक्सेस प्रकल्पाचे प्रमुख गुलजार आझाद यांनी सांगितले.