चित्रपटांतून आपल्या
अफलातून भूमिकांमुळे रसिकांमध्ये लोकप्रिय असलेला सुपरस्टार रजनीकांतचा 600 किलोग्रॅम चॉकलेटचा पुतळा तयार करण्यात आला आहे.

रजनीकांतला नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी एकत्र एकत्र येत चेन्नईमध्ये हा पुतळा तयार केला आहे. येथील झुका नावाच्या कॉफी शॉपमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे.
विजय मल्ल्या थोडे स्लिम होऊन अमिताभ बच्चन यांच्यासारखी पोज देऊन उभे राहिले आहेत की काय असा आभास या पुतळ्याकडे बघून होऊ शकतो. परंतु, ते शक्य नाही. हेअर स्टाईल, गॉगल्स आणि चेहऱ्यावरील हावभाव यांमुळे रजनीकांत यांची ही ‘चॉकलेट छबी‘ लक्षात येते.
या पुतळ्यामध्ये दाखविण्यात आलेला रजनीकांतचा पेहराव काबली या त्याच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेचा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 14 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येणार होता. मात्र, तामिळनाडू विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ट्रेलरचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले.