चीन: इमारतीवर क्रेन कोसळून 18 जणांचा मृत्यू

आग्नेय चीनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 18 ठार तर 18 जण जखमी झाल्याची घटना आज (गुरुवार) घडली आहे, अशी माहिती बचाव दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुआनडॉंग प्रांतातील डॉंगगुआन शहरामध्ये ही घटना घडली. एका इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मोठे क्रेन उभे करण्यात आले होते. अचानक आलेल्या मोठ्या वादळामुळे क्रेन इमारतीवर कोसळले. यावेळी झालेल्या अपघातात 18 मजूरांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात 18 जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बचाव दलाचे अधिकारी लुओ बीन यांनी दिली.

इमारतीवर क्रेन कोसळले यावेळी 139 कामगार काम करत होते. 88 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे, असेही बीन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *