गडचिरोलीत माजी आमदाराच्या अंगरक्षकाची हत्या

अहेरी तालुक्‍यातील थल्लेवाडा येथे माजी आमदार दीपक अत्राम यांच्या अंगरक्षकांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज (गुरुवार) घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त थल्लेवाडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याघटनेत अत्राम यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे यांना गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातून सुदैवाने अत्राम बचावले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. परिसर ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *