महाराष्ट्रातील चाचणीत मॅगी निर्दोष

महाराष्ट्रातील चाचणीत मॅगी निर्दोष

देशातील अनेक राज्यांमध्ये मॅगीच्या नमुन्यांच्या तपासणीत शरीराला हानिकारक घटकांचे प्रमाण अधिक आढळल्याने या राज्यांत मॅगीच्या विक्रीवर बंदीची कारवाई कऱण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात मॅगीच्या नमुन्यांच्या तपासणीत शिसेचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा कमी आढळले आहे. त्यामुळे तूर्तास राज्यात मॅगीला दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ठाणे आणि सांगली येथून मागवलेल्या मॅगीच्या नऊ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या सर्व नमुन्यांमध्ये शिसेचे प्रमाण ०.०४ ते १.४८ पीपीएम पर्यंत आढळले आहे. शिसेचे निर्धारित प्रमाण २.५ पीपीएम असणे गरजेचे असते.

देशभरात मॅगी विक्रीवर बंदी घालण्यात आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगी आरोग्याला धोकादायक नाही, त्यामध्ये कोणताही घातक पदार्थ नसल्याचे समोर आले आहे. तरीही मॅगीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मॅगीच्या गुणवत्तेवरुन देशभरात वाद सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयोगशाळेत मॅगीच्या तपासणीत शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यानंतर सर्वच राज्यांमध्ये मॅगीची तपासणी सुरु करण्यात आली.

आतापर्यंत गुजरात, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांत मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी देशभरातील सर्व दुकानांतून मॅगीचा साठा परत घेण्याचा निर्णय नेस्ले इंडिया कंपनीने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *