मेडिकल सीईटीचा निकाल जाहीर

मेडिकल सीईटीचा निकाल जाहीर

राज्यातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या(डीएमईआर) माध्यमातून घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी-२०१५ या सामायिक परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्यातील २०.८० टक्के विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. या परीक्षेत विभागावर निकालात मुलींनी बाजी मारली असून पुण्याची हर्षता शेट्टी हिने २०० पैकी १९९ गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

तर मुलींचा एकूण २२.८९ टक्के लागला आहे. तर विभागावर निकालात विदर्भाने आपले या निकालावर नाव कोरले आहे. विदर्भाचा एकूण निकाल २७.४४ टक्के लागला आहे.

राज्यातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सात मे रोजी मेडिकल सीईटीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण १ लाख ८९ हजार ५० विद्यार्थी बसले होते. त्यात ८४ हजार ९२९ मुले तर १ लाख ४ हजार १२१ मुलींचे प्रमाण होते. उत्तीर्ण मुलींचे प्रमाण २२.८० टक्के तर मुलांचे प्रमाण १८.२४ असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

या निकालात पुण्याची हर्षिता शेट्टी ही २०० पैकी १९९ गुण मिळवित पहिली आली आहे. तर नागपूरच्या अमित दासगुप्ता याने १९९ गुण मिळवित दुस-या स्थानावर आपले नाव कोरले आहे. तर अकोल्याच्या अर्पित जयपुरी याने १९७ गुण मिळवित तिसरा क्रमांक पटकाविला आहे.राज्यात मेडीकल सीईटीची परीक्षा ही ऐनवेळी केवळ बारावीच्याच अभ्यासक्रमांवर आधारीत घेण्यात आली होती आणि त्यातही निगेटिव्ह गुण पद्धतही रद्द करण्यात आल्याने निकाल वाढला असून यामुळे राज्यातील मुलांना याचा खूप फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया वद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांनी दिली.

विदर्भातील मुलांची सीईटीवर छाप

राज्यात विदभार्तून एकूण ३७ हजार ३१५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी १० हजार २३९ विद्यार्थी यशस्वी झाले असून २७.४४ टक्के निकाल लागला आहे. तर त्यापाठोपाठ मराठवाडा आणि उर्वारित महाराष्ट्राने आपली छाप सोडली आहे. मराठवाड्याचा निकालाचे प्रमाण २०.८० टक्के तर उर्वारित महाराष्ट्रात १७.८३ टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाल्याचे डीएमईआरतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जूनच्या अखेरीस प्रेफरन्स फॉर्म

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जून महिन्याच्या अखेरीस विद्यार्थ्यांकडून प्रेफरन्स फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यात ग्रॅट महाविद्यालय मुंबई, बै.जी. वैद्यकीय महाविद्यालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद या चार विभागयी प्राधिका-यांच्या कार्यालयात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *