शरीरावर दाट केस जास्त बुद्धीमत्तेच निदर्शक

शरीरावर दाट केस जास्त बुद्धीमत्तेच निदर्शक

शरीरावरील दाट केस हे जास्त बुद्धीमतेचं निदर्शक असल्याचं एका अभ्यासातून समोर आले आहे. डॉ. ऐकाराकुडी अलायस मागच्या २२ वर्षांपासून शरीरावरचे केस आणि बुद्धीमतेचा संबंध या विषयावर अभ्यास करत आहेत. इतर सर्वसामान्यांच्या तुलनेत शरीरावर जास्त केस असणारे जास्त उच्च शिक्षित असतात तसेच बहुतांश डॉक्टरांच्या छातीवर जास्त केस असतात असे या अध्ययनातून समोर आले आहे.
डॉ. ऐकाराकुडी यांनी अमेरिकेतील वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांचा  अभ्यास केला. त्यात त्यांना ४५ टक्के पुरुष प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या शरीरावर जास्त केस आढळले. इतर सर्वसामान्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी जणांच्या शरीरावर जास्त केस होते. दक्षिण भारतात केरळमध्ये मेडीकल, इंजिनियरींग आणि कामागारांचा अभ्यास करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *