डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात आलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर चप्पल फेकण्यात आली आहे. कन्हैय्या कुमार भाषण देत असताना त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. चप्पल फेकणारा नेमका कोण आहे याची माहिती मिळालेली नाही, मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यक्रम सुरु होण्याअगोदरदेखील कन्हैय्या कुमारविरोधात बजरंग दलाने ‘भारत माता की जय’ घोषणा देत कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. मात्र कन्हैय्या कुमारने भाषणाला सुरुवात करुन काही वेळ होताच त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. पोलिसांनी चप्पल फेकणा-याला ताब्यात घेतलं आहे.