मानखुर्द परिसरातच आपल्या आई-वडिलांसोबत राहणारा रुपेश बोराडे वयाच्या सहाव्या वर्षीच अनाथ झाला. त्याच्या मावशीने त्याला बालकल्याण समतिीकडे नेले. त्यानंतर पालनपोषणासाठी त्याला मानखुर्दच्या निरीक्षणगृहाकडे सोपवण्यात आले. निरीक्षणगृहातून सहाव्या वर्षी चेंबूर चल्ड्रिन्स होममध्ये दाखल झाल्यानंतर रुपेशच्या आयुष्याला आकार येण्यास सुरुवात झाली. होममध्ये अनेक स्वयंसेवी संस्था मुलांना शिक्षणाबरोबरच खेळ, कलाशिक्षणासाठी प्रशिक्षण देतात. माजी रणजी खेळाडू साहलि कुकरेजा त्यांच्यापैकीच एक. १७ वर्षीय रुपेशची बॅटवरील पकड, फटके मारण्याची शैली पाहून कुकरेजा प्रभावित झाले. त्यांनी रुपेशला विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला रुपेशचा हा क्रकिेटच्या विश्वातील प्रवास त्याला लंडनपर्यंत घेऊन गेला.
एक महिना लंडनमधील शाळेत प्रशिक्षण घेण्याबरोबरच त्यांच्या सामन्यांमध्येही तो भाग घेणार आहे. आज, शनिवारीच तो लंडनकडे झेपावणार आहे. रुपेशमध्ये क्रकिेटवषियी मोठी ओढ आहे, त्यामुळेच संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याला सदैव प्रोत्साहति केले, असे चेंबूर चल्ड्रिन्स होमचे अधीक्षक राहुल कंठीकर सांगतात.
भारताचे प्रतिनिधीत्व करायचेय!
गणित आणि इंग्रजी आवडता विषय असलेल्या रुपेशला क्रिकेट प्रचंड आवडत असले तरी शिक्षणाची कास सोडायची नाही, अशी खूणगाठ त्याने बांधली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिले ध्येय १९ वर्षांखालील मुलांच्या टीममध्ये खेळण्याबरोबरच रणजीमार्गे भारतीय क्रिकेट टीममध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे, असा निर्धार रुपेश व्यक्त करतो.

