मुलींनी जिन्स घालू नये; ग्रामपंचायतीचा फतवा

उत्तर प्रदेशातील एका ग्राम पंचायतीने मुलींनी जीन्स वापरू नये, म्हणून काही अलिखित नियम केले आहेत. दोन्ही नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचा निर्णय ग्राम पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.

मुलींनी ‘जीन्स’ पॅन्ट सारखे तंग कपडे वापरू नयेत. तसेच लग्नात ‘डीजे’ वाजवू नये, असा फतवा बावळी ग्रामपंचायतीने काढला आहे. विवाह सोहळ्यादरम्यान हुंडा घेऊ नये आणि ‘डीजे’ही वाजवू नये.

हे नियम न पाळणाऱ्या ‘एखाद्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले असेल तर त्याच्या तेराव्याला कोणी उपस्थित राहू नये, असाही उतारा त्यावर काढण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *