नांदेडजवळ बसला अपघात; 9 ठार

कर्नाटकात विवाहासाठी निघालेली वऱ्हागडाची मिनीबस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत नऊ जण मृत्युमुखी पडले, तर किमान 12 जण जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड येथील विद्यापीठासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला.

अपघाताबाबत पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या बसमधील वऱ्हाड नांदेड जिल्ह्यातील बारड गावाहून कर्नाटकात विवाहासाठी जात होते. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसला समोरून दिलेली धडक एवढी भीषण होती, की बसचे छत उडून पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *