विश्वास पाठक यांची भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

विश्वास पाठक यांची भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ख्यातीप्राप्त असलेले विश्‍वास वसंतराव पाठक यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाच्या स्थापनादिनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही नियुक्ती केली आहे.
विश्वास पाठक हे एमकॉम, एलएलबी, कंपनी सेक्रेटरी असून, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा त्यांना दीर्घ व दांडगा अनुभव आहे. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी प्रबंध संचालक म्हणून यशस्वी रीत्या काम केले आहे. त्यांचा हा अनुभव लक्षात घेऊनच पक्षाने त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.
टेलिकॉम, एव्हिएशन, ऊर्जा, मीडिया आदी क्षेत्रात त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले आहे.
विश्वास पाठक यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आध्यात्मिक विषयांवर दोनशेपेक्षा जास्त लेख लिहिले असून, ते वर्तमानपत्रात प्रकाशितही झाले आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी संयोजक या नात्याने महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कामही यशस्वी रीत्या केले होते.
खाजगी क्षेत्रातला त्यांचा प्रदीर्घ अनुभव सामाजिक आणि सरकारी क्षेत्रात कसा उपयोगात आणता येईल अन राज्याचे कल्याण साधता येईल, यासाठी ते प्रयत्नरत आहेत. भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळवून देण्यासाठी ते अथक परिश्रम करतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *