मुंबईवर हवाईमार्गाने अतिरेकी हल्ल्या होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याविषयी मुंबई पोलिांनी एक परिपत्रक जारी केले आहे. मुंबईमध्ये पॅरा ग्लायडिंग, पॅराशूट आणि ड्रोन उडवणाऱ्यावर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांकडून यापुर्वीच ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ५ एप्रिल ते ५ मे या दरम्यान हा हल्ला होण्याची शक्यता असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ड्रोन किंवा पॅराशूट उडवले तर त्या व्यक्तीवर कलम १८८ नुसार कारवाई केली जाईल, असे आदेश या परिपत्रकाद्वारे पोलिसांनी दिले आहे.