नेहमीच आपल्या मादक आदांनी चर्चेत असणारी सनी लियोन आता वेगळ्या गोष्टीने चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’ मालिकेत सहभागी झालेली मॉडेल पुजा मिश्रा हिने सनीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे हॉट सीन देणाऱ्या सनीसाठी हा विषयच मोठा हॉट बनला आहे. पुजाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, मी बीग बॉसमधील प्रसिध्द अशी स्पर्धेक होती. या कार्यक्रमात सनी फार उशिरा सहभागी झाली होती. असे असताना सनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये माझ्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करत आहे. यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनात राग निर्माण झाला आहे. दिलेल्या मुलाखतीमध्ये सनिने माझ्या विरोधात अपशब्द वापरून प्रेशकांच्या मनात माझ्या प्रतिष्ठेला बाधा आणली आहे. ज्यामुळे माझ्या बँकेतील एफडी मोडावी लागली. ज्यामध्ये माझे ७० लाखाचे नुकसान झाले आहे.