लंडनमध्ये पान खाऊन थुंकण्यात भारतीय अग्रेसर

भारतीयांची संख्या जास्त असणा-या इंग्लंडच्या लेसिस्टर शहरामध्ये पान खाऊन थुंकण्याचे प्रमाण वाढल्याने पान खाऊन थुंकणा-यांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.

या शहरातील भारतीय नागरिक पान खाणे पसंत करतात. त्यांच्या आवडीमुळे येथील पदपथ खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पान खाऊन रस्त्यावर थुंकण्यास प्रतिबंध करण्याकरिता आता इंग्लंडमध्येही नवा कायदा करण्यात येणार आहे.

मेल्टन रोड व बेलग्रेव रोडवर सोने व्यावसायिकांची दुकाने जास्त असल्याने या दोन्ही रस्त्यांना ‘गोल्डन माइल’ म्हटले जाते. येथे भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात कुठेही पिचका-या मारण्याची सवय लागलेले हे भारतीय लंडनमध्ये पान खाऊन थुंकण्यात अग्रेसर आहेत.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यांवर बंदी असताना भररस्त्यात पानाच्या पिचका-या सोडणा-यांची संख्या वाढली आहे. या समस्येतून मुक्त होण्यासाठी आता इंग्लंडमध्येही नवा कायदा करण्यात येणार आहे.

सार्वजनिक स्थळांना अस्वच्छतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे लेसिस्टर नगरपालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. पान खाऊन थुंकण्यास प्रतिबंध करण्यात येईल आणि अशी व्यक्ति सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *