ब्रिटीश स्तंभलेखकाने सॅमीची मागितली माफी

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बुद्धी कमी असते, अशा आशयाचे विधान करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क निकोलस याने आज (सोमवार) विश्‍वविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी याची बिनशर्त माफी मागितली.

निकोलस याने विश्‍वकरंडक स्पर्धा सुरु होण्याआधी लिहिलेल्या एका लेखामध्ये अशा आशयाच्या केलेल्या विधानावर सॅमी याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर निकोलस याने माफी मागितली आहे.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आपण निर्बुद्ध म्हटलेले नाही. परंतु त्याचबरोबर क्रिकेटच्या थोर परंपरेचा अपमान करणारे विधान माझ्याकडून करण्यात आले, हे मला मान्य आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेचा निकाल काहीही लागला असता; तरी मी विंडीजची माफीच मागितली असती. अर्थातच, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बुद्धी कमी असते, ही वस्तुस्थिती नाही. प्रस्तुत लेख हा मुख्यत: भारत व महेंद्रसिंह धोनीसंदर्भात होता. या स्पर्धेचा विजेता म्हणून माझ्यासमोर भारतीय संघ होता. मात्र वेस्ट इंडिज संघाबद्दल असे विधान केल्याचा मला पश्‍चाताप होत असून मी यासंदर्भात माफी मागतो,असे निकोलस याने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *