पश्चिम बंगाल व आसाम विधानसभेसाठी सोमवारी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. बंगालच्या १८ तर आसामच्या ६५ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
प. बंगालच्या पहिल्या टप्प्यात १३३ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात प. मिदनापूर, पुरुलिया व बांकुरा या नक्षलग्रस्त भागात मतदान होणार आहेत. १८ पैकी १३ मतदारसंघात दुपारी ४ वाजता मतदान आटोपते घेण्यात येईल तर पुरुलिया, मानबाझार, काशीपूर, पारा, रघुनाथनपूर येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालेल.
आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ५३९ उमेदवार रिंगणात आहेत. राज्याच्या विविध भागात विशेषत: भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. ६५ जिल्ह्यात ४० हजार सैनिक तैनात केले आहेत.