अभिनेता नाना पाटेकर यांनी दुष्काळी भागात दारूबंदीची मागणी केली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना नाम नावाची संस्था पाणी अडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केली आहे.
नाना पाटेकर मुंबईत एका कार्यक्रमात भावनिक आवाहन करताना म्हणाले, दोन्ही पिकं गेली आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यांचा काळ संवेदनशील आहे. पीक गेलेच आहे, आता पाणीही नाही. त्यामुळे दु:खात असताना आम्हाला (शेतकऱ्यांना) दारू जवळ करावीशी वाटते. त्या नशेत बैलाच्या गळ्यातला कासरा शेतकरी गळ्याला लावतो, हे होऊ द्यायचे नसेल तर मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तीन महिन्यांसाठी दारूबंदी जाहीर करा. थोडा महसूल बुडेल. पण अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील.