जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

जपानमध्ये शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल होती.

हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी झाला अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भ शास्त्र सर्वेक्षण विभागाने दिली.

जपानच्या दक्षिण किना-यावर असलेल्या होंशु बेटावर किंकी भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जिवीत वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याची माहिती जपानच्या वेधशाळेने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *