फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील मध्यवर्ती परिसरात पॅरिस स्टॉक एक्सचेंजच्या जवळील एका इमारतीत शुक्रवारी स्फोट झाला. इमारतीतमधील सहाव्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे.
या स्फोटाचा दहशतवादाशी संबंध नसून गॅस लीक झाल्यामुळे हा स्फोटा झाल्याचे पोलीस अधिका-याने सांगितले. या स्फोटात अनेकजण जखमी झाल्याचे समजते.
ज्या इमारतीत स्फोट झाला तेथून जवळच पॅरिस स्टॉक एक्सचेंज आणि एएफपी वृत्तसंस्थेचे मुख्य कार्यालय आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. इमारतीतील पीडित व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीमध्ये अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची व्यापारी केंद्रे आहेत.