आता व्हॉट्सअॅपवरून थेट मोबाईलवर कॉल करा

आता व्हॉट्सअॅपवरून थेट मोबाईलवर कॉल करा

सोशल नेटवर्कींग साईट व्हॉट्सअॅप दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत आहे. नेहमी नवीन फिचर्स घेऊन येणारे व्हॉट्सअॅप आता लवकरच आणखी एक नवीन सेवा सुरू करणार आहे. व्हॉट्सअॅपवरून आता थेट मोबाईल किंवा लँडलाइनवर फोन करणे शक्य होणार आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तींशी जोडून राहण्यासाठी सहज उपलब्ध होणा-या व्हॉट्सअॅपला तरुणांची अधिकच पसंती आहे. व्हॉट्सअॅपही आपल्या युझर्ससाठी नेहमीच नव-नवीन फिचर्स आणत असते. याआधी फक्त व्हॉट्सअॅप टू व्हॉट्सअॅप कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इंटरनेटची सेवा पुरवणारे आणि टेलीकॉम ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार ही सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. मुकेश अंबांनींचे रिलायन्स जिओ कॉम ही सेवा लवकरच सुरु करणार आहे.

त्यामुळे आता युझर्स व्हॉट्सअॅपवरून थेट मोबाईलवर किंवा लँडलाईनवर फोन करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप टू व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी लागणारा इंटरनेट डेटा वाचणार आहे. या व्हॉईस कॉलमुळे कमी चार्ज लागेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *