पुण्यात जळीतकांडाचे सत्र सुरूच

पुण्यात जळीतकांडाचे सत्र अजूनही सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्री कात्रज येथे तीन चारचाकी आणि १५ दुचाकी वाहनांला मोठ्या प्रमाणात आग लागली. ही घटना रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

कात्रजमधील गणेशपार्क परिसरात हा प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा ते वीस मिनिटातच आग नियंत्रणात आणली. परिसरातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *