भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं तिकीट जगात सर्वात स्वस्त

भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं तिकीट जगात सर्वात स्वस्त

बुलेट ट्रेनच्या आगमनाच्या बातमीनेही भारतीय सुखावले आहेत. आता या आनंदात आणखी भर टाकणारी बातमी म्हणजे भारतातली ही पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे.

भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. या मार्गासाठी 2800 रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये 713 किमी अंतरासाठी 8000 रुपये आकारले जातात.

 

भारतातल्या बुलेट ट्रेनची काही वैशिष्ट्ये

1. मुंबई-अहमदाबाद मार्गावर 10 स्टेशन्स असतील, ज्यासाठी 98 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

2. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेन ही जगातली सर्वात स्वस्त हाय स्पीड ट्रेन असेल.

3. या मार्गावर चालणाऱ्या अन्य ट्रेन्सच्या एसी-1 च्या तुलनेत (1895 रुपये) बुलेट ट्रेनचं तिकीट फक्त दीडपट जास्त असेल.

4. सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स 534 किमीचं अंतर 8 तासात पार करतात, तर बुलेट ट्रेन हे अंतर 2 तासांत कापेल.

5. 2023 मधील एसी-फर्स्ट क्लासच्या तिकीटानुसार बुलेट ट्रेनचं तिकीट निश्चित केलं जाऊ शकतं.

6. 2023 मध्ये अंदाजे 40 हजार व्यक्ती दररोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील, असा अंदाज बांधला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *