कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणात झारखंडमधील इस्पात या खासगी कंपनीच्या दोन संचालकांनी विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (सोमवार) इस्पातचे संचालक आर. एस रुंगता आणि आर. सी. रुंगता यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही संचालकांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 31 मार्चला होणार असून, या सुनावणीवेळी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार असताना कोळसा खाण वाटप गैरव्यवहार उघडकीस आला होता. या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत.