पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 ऑक्टोबर 2015 रोजी मुंबईत झालेल्या सभेस 3 कोटी 36 लाख 81 हजार 388 रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
माहिती अधिकार विषयाचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या सभेच्या खर्चाबाबत माहिती अधिकारात प्रश्न विचारला होता. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मैदानात (एमएमआरडीए) मोदी यांची सभा झाली होती. या सभेसाठी एमएमआरडीएने जागा उपलब्ध करून दिल्याने त्यासाठी कोणताही खर्च झालेला नाही. मात्र, इतर सुविधांसाठी झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती मिळाली आहे. ती खालीलप्रमाणे –
- मंडप उभारणी – 93 लाख 35 हजार 70 रुपये
- खुर्च्या, बॅरिकेटस्, कारपेट, शौचालय, माईक, टेबल, सोफा, व्यासपीठ, फुलांची सजावट, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सुविधा – 1 कोटी 12 लाख 97 हजार 104 रुपये
- सभेची जाहिरात – 20 लाख 85 हजार 647 रुपये;
- कार्यक्रमाची माहिती देणारे 3000 पत्रके – 3 लाख 33 हजार 900 रुपये खर्च (प्रत्येक पत्रकाला 111 रुपये)
- व्यासपीठावरील बोधचिन्ह, व्यासपीठामागील बॅनर्स, स्वागत कमान, दिशादर्शक आणि आभाराचे फलक आदी – 34 लाख 62 हजार 180