लोकलवर फुगा मारल्याने महिला जखमी

वैशाली दमानिया (३३) या भाईंदर लोकलमधून बोरिवलीला जात असताना चालत्या लोकलमध्ये त्यांच्या डोळ्याला फुगा लागला.

भाईंदर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान त्यांच्या डाव्या डोळ्यावर रंगाच्या पाण्यानं भरलेली पिशवी आदळली. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोळ्यातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला होता.

सध्या त्यांच्यावर मीरा रोडच्या उमराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तत्काळ उपचारामुळे त्यांचा डोळा वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *