खुशखबर! लॅपटॉप किंवा कंप्युटर खरेदी करा फक्त १ रुपयात

संगणक हा आताचा लोकप्रिय आणि गरजेचा विषय बनला आहे. आज बऱ्याच गोष्टी या संगणकावर अवलंबून आहेत. त्यामुळे संगणक हे आजच्या काळाची गरज बनत चालली आहे.

संगणक हा गरजेचा असल्याने तो घरात असणे आवश्यक आहे पण सगळ्यांची आर्थिक परिस्थिती ही सारखी नसल्याने तो प्रत्येकाला घरात आणणे शक्य होत नाही. पण आता हे शक्य होणार आहे.

डेल या कंप्युटर कंपनीने संगणक हे फक्त १ रुपयात उपलब्ध करुन दिले आहे. म्हणजेच आता तुम्ही तो इएमआयवर खरेदी करु शकणार आहात.

डेलने शालेय विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप किंवा डेक्सटॉप खरेदीवर ही ऑफर ठेवली आहे. ऑल इन वन डेक्सटॉप मॉडेल आणि इंस्पिरेशन ३००० फोर्थ जनरेशन कोर आय-३ या लॅपटॉप मॉडेलवर ही ऑफर देण्यात आली आहे.

आणखी ९९९ रुपये भरल्यास कंपनीकडून तुम्हाला आणखी २ वर्षाची वॉरेंटी, १ वर्षासाठी कंटेन्ट पॅक आणि बाटाचं शॉपिंग वाउचर देखील देणार आहे.

ही ऑफर ३१ मे पर्यंत ठेवण्यात आली आहे. तुम्ही लॅपटॉप किंवा डेक्सटॉप बूक केल्यानंतर हा लॅपटॉप तुम्हाला ७ दिवसात मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *