पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अब्देसलामला अटक?

फान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी या हल्ल्याचा सूत्रधार सलाह अब्देसलाम याच्यासह पाच जणांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सजवळ असलेल्या मोलेनबिकमध्ये सलाह लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अखेर सलाहला पकडण्यात पोलिसांना यश आले. सलाहसोबत इतर पाच जणांनाही या कारवाईत अटक करण्यात आली आहे. १३ नोव्हेबरला दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी आत्मघाती हल्ले करत फ्रान्सला हादरवून टाकले होते. या हल्ल्यात १२७ जणांचा हकनाक बळी गेला होता, तर दोनशेहून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *