कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा गुदमरुन मृत्यू

कारमध्ये श्वास गुदमरुन एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. कार लॉक झाल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. मुंबईतील घाटकोपर परिसरात ही घटना घडली आहे.

क्राईम ब्रान्चने काही दिवसांपूर्वी 15 गाड्यांवर कारवाई केली होती. या गाड्यांची पार्किंगची अडचणी असल्याने दामोदर पार्कमध्ये या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. रविवारी दुपारी हा मुलगा खेळता खेळता गाडीमध्ये गेला आणि गाडी बाहेरुन अचानक लॉक झाली. त्यामुळे मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला.

मृत चिमुकला हा दामोदर पार्क परिसरातीलच राहणारा होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *