अंकारा स्फोटात ३४ ठार, १२५ जखमी

तुर्कीची राजधानी अंकारा सोमवारी सकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरली. या स्फोटात ३४ नागरिक ठार तर १२५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता की येथील किझिलाय स्क्वेअर बस थांबा परिसरातील वाहने आणि दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वाहनाची मदत घेण्यात आली असून एक किंवा दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे बोलले जाते. मागील पाच महिन्यांत अंकारातील हा तिसरा हल्ला आहे. या हल्ल्यामागे कुर्दिश बंडखोर आणि इस्लामिक स्टेट (इसिस)चा सहभाग असण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नसून कसून तपास सुरू असल्याचे पंतप्रधान अहमद दावतोघी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *