गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका आरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. ही चर्चा खरी ठरण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सलमान खानने अरबाज आणि मलायकामधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमानचे प्रयत्न अपुरेच ठरणार असल्याचे दिसते. मलायकाचा घटस्फोटाचा निर्णय अंतिम असल्याचे सूत्रांकडून समजते.
मागील तीन महिन्यांपासून मलायका अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती आपला मुलगा अरहानसोबत खारमधील भाड्याच्या घरात राहत आहे.
पाच वर्ष एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. ते दोघे पॉवर कपल या रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत होते. मात्र त्यांनी फक्त तीन भागामध्येच एकत्र काम केले.