सराफांचा संप ११व्या दिवशीही सुरूच

सोन्याच्या दागिन्यांवर लावलेले उत्पादन शुल्क मागे घेण्याच्या मागणीसाठी सराफांनी पुकारलेला संप शनिवारी अकराव्या दिवशीही सुरूच होता.

२ मार्चपासून देशातील बहुतेक सर्व सराफी पेढय़ा बंद आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांवर १ टक्के उत्पादन शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर सराफांनी त्याविरोधात संप पुकारला आहे.

अ.भा. सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरिंदर कुमार यांनी सांगितले की, सरकार जोपर्यंत उत्पादन शुल्क मागे घेणार नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे. १२ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सराफांनाच उत्पादन शुल्क लागू असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *