मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

दुरुस्तीकामानिमित्त पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान रविवारी आणि सोमवारच्या मध्यरात्री रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारी स. १०.३० ते ३.०० या काळात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

शिवाय, हार्बर मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाच्या कामासाठी सहा तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ पर्यंत सीएसटी ते पनवेल, वडाळा ते माहीम आणि ठाणे ते वाशी दरम्यान अप डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणामी शनिवारी सीएसटी स्थानकातून शेवटची पनवेल लोकल रात्री १०.१८ वा. रवाना होईल. तर रविवारी सकाळी पनवेलकरता पहिली लोकल ६.४४ वा. चालविली जाईल. पनवेलहून सीएसटीसाठी पहिली लोकल ६.३५ वा. रवाना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *