‘सुलतान’मधून अनुष्का घेणार ब्रेक!

‘सुलतान’मधून अनुष्का घेणार ब्रेक!

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्ससाठी ही खुशखबर ठरू शकते.
गेल्या दोन महिन्यांपासून विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या निरनिराळ्या बातम्या येत आहेत. आता मात्र या दोघांनीही आपले मतभेद बाजूला सारून पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. अनुष्का ही सध्या सुलतानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.. ब्रेकअपनंतर आपल्या कामात तिनं स्वत:ला गुंतवून घेतलं होतं.
पण, आता मात्र तिनं विराटला भेटण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी तिनं सुलतानच्या शूटिंगमधून थोडा ब्रेकही घेतलाय. नुकतंच, आशिया कपनंतर अनुष्कानं विराटला शुभेच्छा देण्यासाठी ङ्खोनही केला होता.. आता तिनं, विराटला भेटण्यासाठी सुलतानच्या शूटिंगमधून दोन-तीन दिवसांसाठी सुटी घेतलीय. त्यामुळे, आता चाहत्यांचं हे लाडकं सेलिब्रिटी जोडपं पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *