साहित्य:
२ बटाटे
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
२-३ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ, साखर
कोथिंबीर
लिंबू
कृती:
१) बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावे. मध्यम छिद्रे असलेल्या किसणीवर किसून घ्यावेत. किसलेला बटाटा गार पाण्यात घालावा.
२) कढईत १ ते दिड चमचा तूप गरम करावे. १/२ टिस्पून जिरे घालावे. मिरचीचे तुकडे घालावे.
३) किसलेला बटाटा दोन्ही हातांनी पिळून त्यातील पाणी काढून टाकावे आणि कढईत घालावा. निट परतून घ्यावा. मध्यम आचेवर वाफ काढावी. ३-४ मिनीटांनी शेंगदाण्याचा कूट घालावा. मधेमधे कालथ्याने ढवळावे जेणेकरून बटाटा कढईला चिकटणार नाही. बटाटा शिजेस्तोवर वाफ काढावी. मिठ घालावे, थोडी साखर घालावी. पाणी घालू नये नाहीतर बटाट्याचा किस चिकट होतो.
५) कोथिंबीर घालावी, दही किंवा लिंबू बरोबर गरम गरम खावे. जर लिंबाचे गोड लोणचे उपलब्ध असेल तर मस्तच !!
टीप:
१) मुठभर भिजवलेले (२-३ तास) साबुदाणे जर बटाट्याचा किस परतताना टाकले तरीही छान लागतात