सनी लिऑनसोबत फोटो काढू नका: प्रियांका

सनी लिऑनसोबत फोटो काढू नका: प्रियांका

बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने पॉर्न स्टार ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास करणार्‍या सनी लिऑनसोबत असं विधान केलं की, ते ऐकून सनी लिऑनलाही धक्का बसला असेल. सनी लिऑनसोबत तरी फोटो काढू नका, अशी विनंती प्रियांकाने उपस्थित फोटोग्राफर्सना केली.

हे सर्व घडलं स्टार गिल्ड पुरस्कार सोहळ्यादरम्यान. त्याचं झालं असं की, पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला प्रियांका चोप्रापाठोपाठ सनी लिऑनचं रेड कार्पेटवर आगमन झालं. त्यामुळे फोटोग्राफर्सनी दोघींचे एकत्र फोटो काढण्याची विनंती केली. त्यानंतर फोटोग्राफर्सनी प्रियांका आणि सनी लिऑनला फोटोसाठी पोझ देण्यास सांगितले. त्यानंतर प्रियांका म्हणाली, अरे हिच्यासोबत तरी फोटो नका काढू यार. प्रियांका चोप्राची ही प्रतिक्रिया ऐकून सनी लिऑन गोंधळूनच गेली आणि ती काही वेळ प्रियांकाकडे एकटक पाहतं उभी होती.

मात्र, हे बोलल्यानंतर प्रियांकाने मस्करी केल्याचं सांगत ती हसायला लागली आणि दोघींनीही पोझ देत एकत्र फोटोशूट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *