काळवीट शिकार खटला

काळवीट शिकार खटला

काळवीट शिकार प्रकरणी शस्त्रास्त्र बंदी कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या एका खटल्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा जबाब नोंदविण्यासाठी त्याला 10 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.

“खटल्यातील सरकारी पक्षाचे पुरावे सादर करणे संपले आहेत. जोधपूर जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपीचा (सलमान खान) जबाब नोंदविण्यासाठी 10 मार्चची तारीख दिली आहे,” असे सलमानचे वकील हस्तिमल सारस्वत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

तत्कालीन जिल्हाधिकारी रजत मिश्रा यांची फेरतपासणी करण्यात यावी अशी मागणी सलमानच्या वकिलाने केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी दलपत सिंग राजपुरोहित यांनी ती मागणी फेटाळून लावली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये गेला असताना सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. याप्रकरणी खटला सुरू असून मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाचा निकाल देण्यात येणार होता, मात्र काही साक्षीदारांच्या तपासणीसाठी परवानगी देण्यात आल्याने प्रकरण प्रलंबित राहिले. मागील वर्षी 29 एप्रिल रोजी सलमान येथील न्यायालयात हजर राहिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *