डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पिस्तुलाचा चाप ओढला गेल्याने डोक्यात गोळी घुसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘त्रेचाळीस वर्षांचा नागरिक व त्याची मैत्रिण मिळून सेल्फी काढत होते. यावेळी नागरिकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या हातून चाप ओढला गेल्याने गोळी थेट डोक्यात घुसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मैत्रिणीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.‘
दरम्यान, गेल्या वर्षी सेल्फी घेताना जगभरामध्ये किमान 27 जणांचा मृत्यू झाला आहे.