पुण्याच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला.
गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणे शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला तरी जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शिवाजीनगर, औंध, सांगवी, बाणेर, पिंपरी परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली.
पुण्यात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली.