कात्रज घाटाजवळ कात्रजच्या जुन्या बोगद्यामध्ये एसटी बसला बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत एसटी जळून खाक झाली.
ही एसटी स्वारगेटहून भोरकडे जात होती. या बसमध्ये ५७ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.