दौंडजवळ रेल्वेत प्रवाशांवर चोरट्यांकडून वार

दौंड रेल्वे स्थानकाबाहेर आज (सोमवार) पहाटे हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये दौंडजवळ चाेरट्यांकडून दाेन महिला प्रवाशांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. चाेरट्यांनी दौंड स्थानकापासूनच या मायलेकींवर पाळत ठेवली हाेती. रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेवर भर देण्यात आला असताना हा प्रकार झाला आहे.
आज पहाटे सव्वापाच वाजण्याच्या हावडा-पुणे एक्स्प्रेसनेे दौंड रेल्वे स्थानक साेडल्यावर दौंड-पुणे लाेहमार्गाच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळील आऊटरला गाडीतील ३ ते ४ तरूणांनी समिक्षा सिन्हा व तिची आई या मायलेकींवर पाळत ठेवली. दाेघींशिवाय तिसरा कोेणी नाही आणि त्यांच्याकडील वस्तू पाहून त्यांनी गाडीची चेन आेढली. गाडी स्लाे हाेताच त्यांनी बाहेरून खिडकीत हात घालून त्यांच्याकडील वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केल्याने दाेघींच्या हातावर, बेटांवर व दंडावर चाकूने वार करून त्यांनी बँग पळवून नेली. वार केल्याने डब्ब्यात माेठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये अंधारात हा प्रकार झाल्याने मायलेकी प्रचंड भेदरल्या आहेत. सहप्रवासी व दौंड-पुणे-दौंड असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले.
 
चोरीस गेलेल्या एेवजाची नेमकी माहिती उपलब्ध नाही. दाेघींवर दौंड शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *