छत्तीसगड-तेलंगणच्या सीमेवर आज झालेल्या चकमकीत पोलिसांनी ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे नक्षलवादी छत्तीसगड येथून खम्ममच्या दिशेने जात असल्याचे माहिती मिळताचा पोलिसांनी सापळा रचून त्यांना घेरले. नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार करताच पोलिसांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, त्यात ८ नक्षलवादी ठार झाले. दरम्यान नक्षलवादी व पोलिसांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याचे समजते.