बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री बंगल्यातील आंबे खाण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून फेब्रुवारीमध्ये मांझी यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मांझी यांनी मुख्यमंत्री निवासस्थान सोडले नव्हते. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार 7 सर्क्युलर रस्त्यावरील सरकारी निवासस्थानात राहत आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानात असलेल्या आंबे व लिचीच्या झाडांच्या फळांचा मांझी यांनी आस्वाद न घेण्यासाठी नितीशकुमारांना 24 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे नितीशकुमार आणि मांझी यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाचा नेता दानिश रिझवान या नेत्याने नितीशकुमारांकडून बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. नितीशकुमारांनी 8 पोलिस उपनिरीक्षक आणि 16 कॉन्टेबलचा बंदोबस्त ठेवला आहे. नितीशकुमारांनी दलितांचा अपमान केला आहे, असे रिझवान यांनी आरोप केला आहे. पाटणातील 1 आणे मार्गावर मुख्यमंत्री निवासस्थान आहे.