गुजरातेत गावात महिलांना मोबाईल वापरास बंदी

गुजरातेत गावात महिलांना मोबाईल वापरास बंदी

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील सुरज गावात एकाही महिलेला मोबाईल वापरास बंदी करण्यात आली असून, मोबाईल वापरताना दिसल्यास 2100 रुपयांचा दंड ठेवण्यात आला आहे.
 
तंत्रज्ञान हे समाजासाठी नुकसान करणारे आहे, असे मत गावातील ज्येष्ठांनी वर्तविल्यानंतर गावात महिलांना मोबाईल वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अल्पवयीन मुली व महिलांनी मोबाईल वापरु नये असा ठराव करण्यात आला आहे. लवकरच शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे, गावचे प्रमुख देवशी वणकर यांनी सांगितले.
 
महिला मोबाईल वापरताना दिसल्यास तिला 2100 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. तसेच महिला मोबाईल वापरत असल्याची माहिती देणाऱ्याला 200 रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. देशभरात तंत्रज्ञान क्रांती होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये असे निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *