जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनवार मर्यादा घालण्यास सहमती दर्शवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आज (सोमवार) कच्च्या तेलाचे भाव सावरले. अमेरिकी कच्च्या तेलाचा भाव 30 डॉलर प्रती बॅरल झाला आहे.
मागील आठवड्यात प्रमुख तेल निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात होणारा अतिरिक्त तेल पुरवठा रोखण्याचा करार करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या भावाने तेरा वर्षांतील नीचांक गाठला होता.
प्रत्येक देशाने नियम पाळल्यास सौदी अरेबिया व रशिया या प्रमुख उत्पादकांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनाचे प्रमाण कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु इराण व इराकने याविषयी समर्थन न दर्शविल्यामुळे गुंतवणूकदारांनी कराराच्या यशस्वितेबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यामुळे मागील आठवडाभर कच्च्या तेलात घसरण कायम राहिली.
सध्या तेलाच्या किंमतींवर दबाव कायम राहण्याची चिन्हे असून अतिरिक्त पुरवठा कितपत कमी होईल याविषयी भारतीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.