मोठा गाजावाजा करत रिंगिंग बेल्सने बुधवारी फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन लाँच केला. आज सकाळी सहा वाजल्यापासून या स्मार्टफोनसाठी बुकिंग सुरुही झाली. मात्र ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सुरुवातीलाच साईट क्रॅश झाली.
इतक्या कमी किंमतीत चांगले फीचर्स देणाऱा स्मार्टफोन लाँच झाल्याने लोकांची वेबसाईटवर अक्षरश: झुंबड उडाली. मात्र वेबसाईट क्रॅशची समस्या दूर झाल्यानंतर पेमेंट करताना अडचणी येत असल्याने अनेक यूझर्सचे म्हणणे आहे. वारंवार पत्ता देऊनही पेज रिफ्रेश होऊन पुन्हा पत्ता टाकावा लागतोय. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.
साइट डाऊन झाल्यानंतरही यूझर्सनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. काही लोकांनी कंपनीवर टीकाही केली. या स्मार्टफोनची वेबसाईट सुरु होत असली तर पेमेंट प्रक्रिया पूर्ण होत नाहीये.